रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अपघात विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विठोबा बारक्या कीर (वय ६५, रा. जुवे कीरवाडी पो. कर्ला, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठोबा कीर हे घरी दुपारी जेवण करुन हॉलमध्ये टिव्ही पहात होते. अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









