रत्नागिरी:- शहरातील भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अक्षय शशिकांत आयरे (वय ३०, रा. फणसोप सडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हि घटना गुरुवारी (ता. १२) रात्री बाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय आयरे याला भुतेनाका रस्त्यावर अचानक फिट आली. तात्काळ त्याला अलंकार आयरे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









