Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

रत्नागिरी:- बुधवारी दुपारी भाट्ये समुद्रकिनारी मिळून आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (65,रा.आरटीओ रोड कुवारबाव, रत्नागिरी) असे त्या महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी भाट्ये गावचे नागरिक तहा काद्री आणि तेथील सरपंच पराग भाटकर यांना ही महिला समुद्रकिनारी बेशूध्द अवस्थेत पडलेली दिसून आली होती. त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान,बुधवारी रात्री महिलेचा मुलगा चंदन बिर्जेने तिला अधिक उपचारांसाठी खासगि रुग्णालयात दाखल केले.