Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी रामआळी येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

रामआळी येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- जेवण करुन झाल्यानंतर औषधे घेऊन झोपलेल्या वृद्ध महिलेची हालचाल होत नसल्याने नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. विद्या दत्तात्रय पाटणकर (वय ८२, रा. रामआळी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध विद्या पाटणकर या जेवण झाल्यानंतर औषधे घेऊन झोपल्या होत्या मात्र त्यांची कोणतीस हालचाल दिसून न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.