Friday, October 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी आठवडा बाजार, कुवारबाव येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

आठवडा बाजार, कुवारबाव येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील पालिकेच्या बंद गाळ्याच्या बाहेर तर कुवारबाव बाजारपेठ येथील गॅरेजच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह आठवडा बाजार येथे १ हजार १५५ रुपयांचा तर कुवारबाव बाजार पेठ येथे २ हजार २५७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

शहर पोलिस ठाण्यात दोन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल सुधाकर धुमक (वय ४०, रा. सड्ये, रत्नागिरी) व योगेश रमेश तोडणकर (वय ४७, रा. सोमेश्वर-तोणदे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा सातच्या सुमारास निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे विनापरवाना मटका जुगार खेळ चालवत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या कारवाई त्याच्याकडून साहित्यासह एकूण ३ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर व पोलिस कॉन्स्टेबल निलेश शिंगवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.