Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी स्टेट बँक कॉलनी येथील बागेचे गेट चोरण्याचा प्रयत्न

स्टेट बँक कॉलनी येथील बागेचे गेट चोरण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील एका पडिक गार्डनचे लोखंडी गेट दुचाकीवरून चोरून नेण्याचा प्रयत्न परिसरातील महिलाव जागरुक नागरिकांमुळे उधळून लावण्यात आला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे व तत्परतेमुळे सार्वजनिक मालमत्तेची चोरी होण्यापासून बचाव झाला. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्टेट बँक कॉलनी येथील गार्डनचे गेट अनोळखी इसम दुचाकीवरुन चोरून नेत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील इतर महिलाही मदतीसाठी पुढे आल्या. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती लावगणकर यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देसाई व उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

यावेळी प्रवीण देसाई यांनी सिद्धी शिरगावकर तसेच मदतीसाठी पुढे आलेल्या इतर महिलांचे आभार मानले. देसाई म्हणाले, सार्वजनिक मालमत्ता ही समाजाची सामूहिक संपत्ती असून तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सिद्धी शिरगावकर आणि इतर महिलांनी सामाजिक भान राखत दाखविलेली जागरूकता व धाडसाचे कौतुक केले. यावेळी गार्डन परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.