Tuesday, September 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या गोळप येथील प्रौढाचा मृत्यू

फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या गोळप येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-शिरंबाड येथील प्रौढाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिपक भिकाजी घाणेकर (वय ५४, रा. गोळप-शिरंबाड, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक घाणेकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ व उलट्या होऊ लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.