Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा तिठा येथे मोटार- दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

हातखंबा तिठा येथे मोटार- दुचाकीचा अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरिल दोघे तरुण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शुभम संतोष घवाळी (वय ३०) व राहूल सुनिल पालेकर (वय २६, दोघेही रा. खेडशी नाका रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास हातखंबा तिठा येथील वळणावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम घवाळी व राहूल पालेकर हे दोघे दुचाकी (क्र. एमएच-०८ एएच ८८७७) वरुन रत्नागिरी ते निवळी जात होते. तर मोटार (क्र. एमएच-०३ बीडब्ल्यू ७३३१) ही मोटार रत्नागिरीहून पालीकडे जात असताना हातखंबा तिठा येथील वळणावर दुचाकी व मोटार यांच्या धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील घवाळी व पालेकर हे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.