रत्नागिरी:- तालुक्यातील हरचिरी येथील तरुणाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष पांडुरंग मांडवकर (वय २५, रा. हरचिरी, रत्नागिरी) असे गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.









