रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल, पालीकेची बंदशाळा, भाटये बीच, तसेच ग्रामीण भागातील निवळी पेट्रोल पंप, खरवते, येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित सुभाष मालगुंडकर (वय ३३, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) राकेश जगन्नाथ लाड (वय ५०, रा. झारणी रोड, रत्नागिरी), अशोक श्रीपत शिंदे (वय ५५, रा. निवळी, शिंदेवाडी, रत्नागिरी), राजेंद्र संभाजी मालप (वय ४२, रा. निवळी मालपवाडी, रत्नागिरी), चंद्रकांत शंकर पिलणकर (वय ५६, रा. सनगरेवाडी, कोतवडे, रत्नागिरी), प्रतिक सुरेश सिंग (वय २६, रा. सिद्धिविनायकनगर, शिवाजीनगर, रत्नागिरी) अशी सहा संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १३) दुपारी ते रात्री विविध ठिकाणी निदर्शनास आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील, राकेश बागुल, पोलिस कॉन्स्टेबल बाळू गिते, पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे, प्रदिप पाटील, पोलिस हवालदार प्रमोद कांबळे यांनी शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









