Tuesday, May 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन नातेवाईकात राडा

मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन नातेवाईकात राडा

अंगणातील कचऱ्यावरुन हाणामारी ; ९ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन झालेल्या मारहाण व दुखापत झाली. या प्रकरणी संशयित नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंमकार दत्ताराम मयेकर (वय ३५), दत्ताराम शांताराम मयेकर (वय ७०), दर्शना दत्ताराम मयेकर (वय ६५, सर्व रा. मिरजोळे, भाटकरवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २३) रात्री दहाच्या सुमारास मिरजोळे-भाटकरवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सदानंद पांडूरंग मयेकर (वय ६०, रा. मिरजोळे-भाटकरवाडी, रत्नागिरी) हे नात्याने भाऊ, पुतण्या, चुलते आहेत. यांच्या सामाईख घर व जमिन जागेवरुन वाद आहेत. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास यातील संशयित ओंमकार, दत्ताराम, दर्शना मयेकर यांनी फिर्यादी यांच्या घरात येवून ओमकार मयेकर यांने त्यांचे चुलते कृष्णा शांताराम मयेकर यांचे घरासमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरुन फिर्यादी सदानंद मयेकर यांच्याशी वाद घातला व मारहाण करुन त्यांच्या डोक्यात चिव्याची काठी मारुन दुखापत केली.

तर फिर्यादी कृष्णा शांताराम मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते घरात असताना रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित ओमकार दत्ताराम मयेकर-३५, दत्ताराम शांताराम मयेकर-७०, दर्शना दत्ताराम मयेकर-६५, नितीन दत्ताराम मयेकर-३८ (सर्व रा. मिरजोळे-भाटकरवाडी, रत्नागिरी) यांनी फिर्यादी यांच्या खोलीसमोर अंगणामध्ये असलेल्या कचरा फिर्यादी कृष्णा मयेकर यांनी उचललेला नाही या कारणावरुन शिवागाळ व चिव्याच्या काठीने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी कृष्णा मयेकर हे जखमी झाले. दरम्यान, फिर्यादी ओंकार दत्ताराम मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी (ता. २३) रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित कृष्णा शांताराम याने दुपारी अंगाणातील कचऱ्यावरुन झालेल्या वादामुळे त्या रागातून तो फिर्यादी यांच्यावर राग ठेवून फिर्यादी ओंकार मयेकर हे कामावरुन आल्यानंतर संशयित सदानंद मयेकर व कृष्णा मयेकर यांनी शिवीगाळ करुन फिर्यादी ओंकार मयेकर यांच्या डोक्यात उजव्या बाजूला लोखंडी कुऱ्हाड मारुन दुखापत केली. तर फिर्यादी यांच्या आईला बोटाला संशयित सदानंद मयेकर यांनी चावा घेतला. तर संशयित कृष्णा मयेकर हे हातात दगड घेवून मारण्यास आला अशा तिघांनीही शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या असून पोलिसांनी नऊ जणांवर परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.