Sunday, May 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मारुती मंदिर येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

मारुती मंदिर येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर जवळील विश्वनगर परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने तांत्रिक बाबींचा वापर करून एका व्यक्तीच्या बँक खात्यातून एकूण ५५ हजार ४०० रुपये लंपास केले आहेत. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश सखाराम आंबेकर (वय ४५, मूळ रा. आंबेड, ता. संगमेश्वर, सध्या रा. स्वामी बंगला, विश्वनगर, मारुती मंदिर, रत्नागिरी) यांचे ‘बँक ऑफ इंडिया’च्या कुरधुंडा (ता. संगमेश्वर) शाखेत बँक खाते आहे. दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, आंबेकर हे मारुती मंदिर येथील त्यांच्या राहत्या घरी असताना, अज्ञात भामट्याने त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने काही तांत्रिक क्लृप्त्या वापरून त्यांच्या बँक खात्यात प्रवेश मिळवला. चोरट्याने आंबेकर यांच्या खात्यातून पहिल्यांदा ४०,००० रुपये आणि त्यानंतर १५,४०० रुपये अशी एकूण ५५,४०० रुपयांची रक्कम बेकायदेशीरपणे काढून घेत त्यांची फसवणूक केली.

​आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेकर यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी २१ मे रोजी रात्री ८ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५९/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४) (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.