Friday, July 10, 2026
spot_img
Home लांजा भांबेड येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भांबेड येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

लांजा:- तालुक्यातील भांबेड, पवारवाडी येथील रवींद्र आत्माराम बाईत (वय ४७) यांचा सेप्टिसीमियासह यकृत सिरोसिस या आजाराने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १८ मे २०२५ रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र बाईत यांना अचानक पोटात दुखू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने लांजा येथील सोनाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.