Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड दुचाकीला धडक देऊन फरार टेम्पो चालकावर गुन्हा

दुचाकीला धडक देऊन फरार टेम्पो चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील कुडोशी जांभुळवाडी येथे १८ मे रोजी दुपारी ४.३५ वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगेश मनोहर मोहिते (४२, रा. उन्नती कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, मूळ रा. चाकाळे, कोळकेवाडी, ता. खेड) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी १९ मे रोजी खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश मोहिते हे त्यांच्या मेव्हण्याची होंडा अॅक्टिव्हा (एम.एच. १५ जे.एफ. ६९२७) घेऊन खेड ते देवघर बौद्धवाडीकडे जात होते. कुडोशी जांभुळवाडी येथे आले असता, समोरून भरधाव वेगाने आणि हयगयीने येत असलेल्या महिंद्रा सुप्रो (एम.एच. ०८ टी.सी. ८१०) या चारचाकी वाहनावरील चालक प्रदीप गावदू पाटील (३५, रा. शिवतर रोड, भडगाव उसरेवाडी, ता. खेड) याने आपले वाहन पूर्णपणे चुकीच्या बाजूने आणले. त्याने मोहिते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे दुचाकीसह मोहिते फरफटत डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खड्यात पडले आणि त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी खेड पोलिसांनी भादंवि कलम २८१, १२५ (अ)(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा (गु.र.नं. १५४/२०२५) दाखल केला असून, आरोपी वाहनचालक प्रदीप पाटील याचा शोध सुरू आहे.