खेड:- तालुक्यातील संगलट ओवली स्टॉप येथून मोटारसायकलवरुन बाहेर गेलेले हमीम कलाम नाडकर (वय २४, रा. संगलट मोहल्ला, खेड) हे १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीपासून गूढ रीतीने गायब झाले आहेत. ते अद्यापही मिळून न आल्यामुळे, त्यांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची संशयित तक्रार त्यांच्या पत्नीने खेड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अपहरीत तरुण हमीम कलाम नाडकर हे १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संगलट ओवली स्टॉप येथून गाडी घेऊन बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा शोध घेऊनही त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.
या प्रकरणी फिर्यादी पत्नी फिरदोस हमीम नाडकर (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:१८ वाजता गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४० (३) आणि जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३६५ नुसार अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









