Saturday, September 26, 2026
spot_img
Home खेड खेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड:- खेड तालुक्यातील शिंगरी बौद्धवाडी येथील राहत्या घरात ३५ वर्षीय तरुणाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश दगडू पवार (वय ३५, रा. शिंगरी बौद्धवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पवार हे शिंगरी बौद्धवाडी येथील आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. ही घटना २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३३ वाजता खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.