Saturday, September 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण

चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण

रत्‍नागिरी:- शहरातील चर्मालय येथील चार रस्त्‍यावर तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्‍याला मारहाण केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास घडली.

रोहन संजय धोत्रे (23, रा.क्रांतीनगर,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात आकाश चंद्रकांत खेत्री (24, रा.क्रांतीनगर झोपडपट्टी,रत्‍नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,गुरुवारी सायंकाळी फिर्यादी आकाश खेत्री हा दुचाकीवरुन चर्मालय चार रस्ता येथून जात असताना संशयित रोहन धोत्रे याने त्‍याची दुचाकी अडवून हातातील कडे त्‍याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्‍यानंतर त्‍याला शिवीगाळही केली. याप्रकरणी संशयिता विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),126(2),352 प्रमाणे भादंवि कायदा कलम 324,341,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.