Monday, September 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गोळप येथे घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास

गोळप येथे घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी: रत्नागिरी परिसरातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चोरी २५ जुलै रोजी रात्री ८ ते २७ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घर बंद असल्याचे फायदा उठवत चोरांनी घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने असा एकूण ९ लाखांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. २७ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.