रत्नागिरी:- शहरानजीकच्या एकतानगर-खेडशी येथून तरुणाचा अपहरण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ऑगस्टला सायंकाळी चार च्या सुमारास मोरया एकतानगर, खेडशी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उत्तम सदानंद कोलगे (वय ५४, रा. मोरया एकतानगर खेडशी रत्नागिरी) मुलगा अपहारित सुयोग उत्तम कोलगे हा २० ऑगस्टला त्यांची आई सौ. उल्का उत्तम कोलगे हिला कारवांचीवाडी येथे केस कापण्यासाठी जातोय असे सांगून घरातून निघून गेला तो अद्याप परत घरी आलेला नाही. या प्रकरणी वडिल उत्तम कोलगे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मुलगा सुयोग चे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









