चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सावर्डा धबधबा जवळील वळणावर बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात राजस्थानमधील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेलर चालक किशन रतन सिंह (वय 29, रा. गोहाना, अजमेर, राजस्थान) हा उत्तर प्रदेश ते जयगड, रत्नागिरी असा प्रवास करीत होता. परशुराम घाटातील सावर्डा धबधब्याजवळील धोकादायक वळण व उताराची माहिती असूनही त्याने वाहन वेगाने चालविले. वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला.
या अपघातात ट्रेलरमधील किशन रतन सिंह यास गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









