Monday, October 26, 2026
spot_img
Home चिपळूण कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिला जखमी झाल्या. MH.08 AB 4219 या क्रमांकाच्या दुचाकीवरून चिपळूण येथून सावर्डेच्या दिशेने जात असताना कापसाळ येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली आणि मागे बसलेल्या साधना नागसेन कांबळे (वय ५६, रा. पाग, चिपळूण) या रस्त्यावर पडून दुखापतग्रस्त झाल्या. हा अपघात रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडला.

घटनेची माहिती मिळताच शासकीय विश्रामगृहाजवळ तैनात असणाऱ्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोवीस तास तत्पर असणाऱ्या या रुग्णवाहिकेचे चालक सत्यम पवार यांनी कोणतीही वेळ न दवडता जखमी कांबळे यांना सुरक्षितरीत्या उपचारासाठी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघात घडताच मिळालेल्या या तत्पर वैद्यकीय सेवेमुळे अपघातग्रस्त महिलेवर वेळेत उपचार सुरू करणे शक्य झाले.