Monday, August 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी शेतातून ४५ हजारांचा पॉवर विडर लंपास

शेतातून ४५ हजारांचा पॉवर विडर लंपास

खेड- तुळशी खुर्द येथील घटना

खेड:- तालुक्यातील तुळशी खुर्द येथील निंबाऱ्याचा माळ परिसरातून शेतात उभा असलेला ४५ हजार रुपये किमतीचा पॉवर विडर (शेती नांगरण्याचा छोटा ट्रॅक्टर) अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून २४ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडला. फिर्यादी सुधाकर शंकर दरेकर (वय ६०, रा. तुळशी खुर्द, दरेकरवाडी, ता. खेड) यांच्या शेतात हा पॉवर विडर ठेवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने विनापरवानगी आणि लबाडीच्या इराद्याने हा पॉवर विडर चोरून नेला.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ४५,००० रुपये किमतीचा लाल रंगाचा ‘VKA 170F Power Weeder 7HP’ हा पॉवर टेलर (शेत नांगरणी यंत्र) समाविष्ट आहे. या प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:४५ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.