Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी धामणसे येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५ वर्षांच्या बालकाला क्रुझरची धडक; चालक फरार

धामणसे येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५ वर्षांच्या बालकाला क्रुझरची धडक; चालक फरार

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणसे सांबरेवाडी येथे एका बेजबाबदार चालकाने लहान मुलाला धडक देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.

तुकाराम शंकर जाधव (वय ६३, रा. कराड, जि. सातारा) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. १ जून रोजी दुपारी १:४५ च्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी सुनिता जाधव ही आपल्या ५ वर्षांचा नातू रियांश राहुल जगदाळे याचा हात पकडून रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी गणपतीपुळे बाजूकडून येणाऱ्या एका क्रुझर वाहनाच्या (क्र. MH-20-DJ-0876) चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून लहानगा रियांश याला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे रियांश याला लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त बालकाला मदत करण्याऐवजी क्रुझर चालक न थांबता गाडीसह घटनास्थळावरून वेगाने निघून गेला. याप्रकरणी ९ जून रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.