Friday, October 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजा येथे गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

लांजा येथे गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

लांजा:- लांजा तालुक्यातील गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कुणाल मदन होलम (वय ४० वर्षे, रा. लांजा एस.टी. स्टँडजवळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गोंडेसखळ रस्त्यावरील निर्जन सड्यावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे (ब.नं. १०७) व त्यांचे सहकारी गोंडेसखळ रोड परिसरात गस्तीवर असताना, आरोपी कुणाल होलम हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी तातडीने धाड टाकून खातरजमा केली असता तो बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५) चे कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.