Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगडात जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू

जयगडात जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- इजिप्तहून कोळसा घेउन जयगड येथील समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार 20 जून रोजी रात्री 8.20 वा.सुमारास घडली.

एलमीर अल्कारेज मोलीना (51,रा.आरगाव सेबु,फिलिपिन्स) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. तो एम.व्ही.डाली या जहाजावर सेकंड इंजिनिअर म्हणून कामाला होता. हे जहाज इजिप्तहून कोळसा घेउन जयगडपासून सुमारे नॉटिकल मैल समुद्रात नांगर टाकून उभे होते. त्यावेळी एलमीर मोलीना हा आपल्या केबीनमध्ये जेवण करुन गेलेला परत बाहेर न आल्याने इतर क्रू मेंबरनी त्याच्या केबीनमध्ये जाउन पाहिले असता त्यांना तो बेशुध्द पडल्याचे दिसून आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. परंतू तरी देखील तो बेशुध्द असल्याने त्याला आरोग्य केंद्र खंडाळा येथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणी करुन मृत घोषित केले.