Sunday, August 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी कारवांचीवाडी येथे नदीत बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

कारवांचीवाडी येथे नदीत बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

गयाळवाडी परिसरात शोककळा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरा नजीक गयाळवाडी परिसरातील काही तरुण पोहण्यासाठी गेले असताना, नदीपात्रात बुडून एका ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातामुळे गयाळवाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गयाळवाडी परिसरातील ४ ते ५ तरुण रविवारी कारवांचीवाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी हे तरुण सार्थक सुहास गुरव (वय ११) या बालकालाही आपल्यासोबत घेऊन गेले होते. कारवांचीवाडी येथील नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठा होता. दरम्यान, पोहत असताना सार्थक गुरव हा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीपात्रात बुडाला.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठा शोक अनावर झाला आहे. तरुण वयातील चिमुकल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गयाळवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.