Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी प्रशांतनगर येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

प्रशांतनगर येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील प्रशांतनगर-मजगांव रोड येथील वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास जाणवून लागल्याने खासगी रुग्णालयातून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. रेखा शिवाजी शिंदे (वय ६७, रा. प्रशांतनगर, मजगावरोड-रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेखा हिच्या पायला कोना झाला म्हणून रविवारी कोकणनगर येथील डॉक्टरकडे जावून टीटीचे इंजेक्शन घेतले. घरी आली असता अचानक तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तोंडातून फेस येवून ती बेशुद्ध पडली. तत्काळ तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टर नसल्यामुळे अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.