Wednesday, May 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी धनादेश अनादर प्रकरणी एकाला शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणी एकाला शिक्षा

रत्नागिरी:- हातउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेल्या धनादेशाचा अनादर प्रकरणात आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. ३ महिने साधा कारावास व ४ लाख ५० हजार रुपये व त्यावर केस दाखल झाल्यापासून वसूल होईपर्यंत ९ टक्के व्याजासह दोन महिन्यात रक्कम परत करण्याचा आदेश दिला. निरंजन हेमंत सावंत असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सावंत याने तक्रारदार यांच्याकडून २०१९ मध्ये ४ लाख ५० हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचे सांगून उसने घेतले होते. ही रक्कम परतफेड करतेवेळी आरोपी याने धनादेश दिला होता. या धनादेशाचा अनादर झाल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांच्यावतीने ॲड. डी. ओ. आठवले व ॲड. एन. डी. आठवले यांनी काम पाहिले.