Thursday, May 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासन सज्ज

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासन सज्ज

चिपळूणमध्ये आजपासून ‘फील्ड ट्रेनर्स’चे प्रशिक्षण

रत्नागिरी:- देशातील आगामी जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. या जनगणनेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील ‘फील्ड ट्रेनर्स’ सोमवार दिनांक ६ एप्रिलपासून चिपळूण येथील पंचायत समिती कार्यालयात सुरू होत आहे. उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी या नियोजित प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रशिक्षणाचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. पहिला टप्पा ६ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दुसरा टप्पा ९ ते ११ एप्रिल या कालावधीत होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे आणि राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जनगणना कार्यालयाचे संजीव गावकर हे ‘जनगणना समन्वय अधिकारी’ म्हणून उपस्थित राहून तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवणार आहेत.

यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रामुख्याने अनेक मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. माहिती संकलनासाठी विकसित केलेल्या विशेष ॲपचे तांत्रिक प्रशिक्षणनागरिकांशी संवाद साधताना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची योग्य हाताळणी कशी करावी. डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

“डिजिटल माध्यमाद्वारे माहिती संकलित होणार असल्याने मानवी चुकांचे प्रमाण कमी होईल. या प्रशिक्षणामुळे फील्ड ट्रेनर्स अधिक सक्षम होतील आणि प्रत्यक्ष जनगणनेचे काम सुलभ होईल,” असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
चिपळूण येथील या प्रशिक्षणाच्या शुभारंभानंतर संपूर्ण जिल्ह्यात जनगणनेच्या कामाला अधिक वेग येणार आहे.