Friday, June 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर वाहतूकीस अडथळा; दोघांवर गुन्हा

गणपतीपुळे ते जयगड रस्त्यावर वाहतूकीस अडथळा; दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते जयगड जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरिल केदारवाडी येथे वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोघा वाहन चालकांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिता कृष्णा शेट्टी (रा. सानपाडा, दहिसर (ई) मुंबई) व सुदेश चंद्रकांत साळवी (वय ५२, रा. भगतसिंग नगर २ राजाराम गल्ली, लिंक रोड मोतीलाल नगर मुंबई) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. २४) दुपारी साडेचार व सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गणपतीपुळे-केदारवाडी रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर व पोलिस शिपाई निलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.