Wednesday, June 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी कर्ला येथील पोलिस पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ

कर्ला येथील पोलिस पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ

रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलिस पाटील यांनी अज्ञात कारणातून गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या उदयच्या जाण्याने कर्ला-लिमयेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत

उदय मधुसुदन लिमये (वय ५६, रा. लिमयेवाडी, कर्ला, रत्नागिरी) ही घटना बुधवारी (ता. २८) दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदय लिमये हे कर्ला-लिमयेवाडी प्रभागात पोलिस पाटील म्हणून कार्यरत होते. तसेच ते वादक म्हणूनही प्रसिद्ध होते. बुधवारी सकाळी त्यांची पत्नी अंगणवाडीत कामाला गेली होती. घरी कोणही नव्हते अशा स्थितीत उदय यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून घराच्या छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतला. दुपारी पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ घरातील मंडळींना सांगितले. त्याच्या भावाने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उदय लिमये यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस पाटील उदय लिमये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.