Thursday, June 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सीसीटिव्ही कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक

सीसीटिव्ही कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक

करबुडे येथील घटना; न्यायालयाची दंडात्मक कारवाई

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रुम (टिव्हीसीआर) मधील डीजे रुमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी ४८ तासात अटक केली.

रफिक महमद खान (वय २९, रा. साळवीस्टॉप) व साहिल संजय जाधव (वय २९, रा. पोलिस लाईन, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १ नोव्हेबरला दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञाताने टीव्हीसीआरच्या डीजे रुमचे शटर उचकटून कुलुप तोडले. त्यानंतर त्याने अनधिकृतपणे खोलीत प्रवेश करुन सीसीटिव्ही केबल तोडली व कॅमेरा चोरण्याचा प्रय़त्न केला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस निरीक्षक रत्नागिरी व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन पुरावे गोळा केले. तसेच जवळील परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी फक्त दोन दिवसांत संशयितांना शोधून काढले व संशयित रफिक खान व साहिल जाधव यांना अटक केली. मंगळवारी (ता. ४) संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितांवर दंडात्मक कारवाई करुन सोडून देण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाली अथवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.