Monday, October 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापूर एस.टी. डेपो परिसरातून दुचाकी चोरीला

राजापूर एस.टी. डेपो परिसरातून दुचाकी चोरीला

अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर एस.टी. डेपोच्या बाहेरील रस्त्यावरून एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष दशरथ कर्ले (वय ५८, रा. तेलीवाडी, कोड्ये तर्फे राजापूर) हे १७ ऑक्टोबर रोजी रात्री १.५० वाजण्याच्या सुमारास भजनाचा कार्यक्रम संपवून घरी जाण्यासाठी आपल्या दुचाकीजवळ गेले असता, त्यांची गाडी तिथे दिसून आली नाही.
त्यानंतर फिर्यादी यांनी आपले मित्र जगदीश गुरव आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने राजापूर एस.टी. डेपो परिसर, कोदवली पेट्रोल पंप, जवाहर चौक आणि राजापूर बाजारपेठ भागात शोध घेतला; मात्र दुचाकीचा कुठेही पत्ता लागला नाही.
कोणत्यातरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने गाडी चोरून नेल्याचे निष्पन्न झाल्याने, सुभाष कर्ले यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरून नेलेली गाडी काळ्या रंगाची असून तिच्या बाजूला निळा व लाल रंगाचा पट्टा असलेली हिरो स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH 08 AA 9401) असून तिची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.