Monday, June 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जयस्तंभ येथे दोन तरुणांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

जयस्तंभ येथे दोन तरुणांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

रत्नागिरी:- शहरातील गीताभवन, जयस्तंभ येथे हॉकीच्या स्टीकने मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्ताराम महाडीक (सध्या रा. मारुतीमंदिर, रत्नागिरी. मुळ ः रा. नरबे, करबुडे-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास जयस्तंभ एसटी स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक शशिकांत रहाटे (वय ३४, रा. तेली आळी, रत्नागिरी) यांचे संशयित गणेश महाडीक यांच्या पत्नी प्रेमसंबध असून गणेश व त्याची पत्नी यांचा न्यायालयात डिवोर्सचा दावा चालू आहे. सोमवारी रात्री फिर्यादी अभिषेक हे जयस्तंभ येथे उभे असताना संशयित गणेश हा मोटार (क्र. एमएच-०२ सीपी २७३६) गाडी घेऊन तेथे आला. गाडीतून उतरुन तू माझ्या बायकोला फिरायला घेऊन जातोस काय, तू कसे लग्न करतोस ते बघतो असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. फिर्यादी यांनी त्याला रोखले असता संशयित गणेश यांने मोटारीतून हॉकीची स्टिक काढून मारहाण केली. त्यांच्या डोक्याला गालावर, ओठावर, दातावर मारुन दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी अभिषेक रहाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.