Monday, July 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी पाली येथील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

पाली येथील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरातील नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पाली उड्डाणपूल आजपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांची प्रतीक्षा आता संपली आहे.

पाली गावातून जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पण आता या उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे. विशेषतः आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि शालेय बसना याचा मोठा फायदा होणार आहे.या पुलामुळे रत्नागिरी शहराकडे तसेच परिसरातील गावांकडे जाणारी वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.

पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर स्थानिक नागरिक, वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणांचे आभार मानले.
आता या पुलामुळे वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.