Sunday, July 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी मंगला एक्स्प्रेसच्या महिला डब्यात धुमाकूळ; परप्रांतीय तरुणांना तत्काळ काढले बाहेर

मंगला एक्स्प्रेसच्या महिला डब्यात धुमाकूळ; परप्रांतीय तरुणांना तत्काळ काढले बाहेर

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी
सचिन देसाईंनी तातडीने हलवली सूत्रे

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर धाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात बेकायदेशीरपणे घुसून सिगरेट आणि गुटख्याचा धूर करत महिला प्रवाशांचा छळ करणाऱ्या हुल्लडबाज परप्रांतीय तरुणांना कोकण रेल्वेने चांगलाच धडा शिकवला आहे. याबाबतची माहिती कळताच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने सूत्रे हलवली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने खेड रेल्वे स्थानकावर या गाडीला घेरून सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली.

गाडी क्रमांक १२६१८ मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमध्ये पुरुष प्रवाशांनी महिला डबा हायजॅक केल्याची गंभीर दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली. जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी थेट रेल्वे सुरक्षा बल अलर्ट केले. रेल्वे रोहा सोडून पुढे सरकलेली असल्याने, पुढील प्रमुख स्थानक असलेल्या ‘खेड’ येथे कारवाईचा सापळा रचण्यात आला. रेल्वे जशी खेड रेल्वे स्थानकावर पोहोचली, तशी आधीच तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने थेट महिला डब्यावर धावा बोलला. पोलिसांना पाहताच डब्यातील हुल्लडबाज परप्रांतीय तरुणांची पळापळ सुरू झाली. मात्र, पोलिसांनी डब्याला वेढा घालून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या आणि महिलांना त्रास देणाऱ्या सर्व पुरुषांना कॉलर पकडून बाहेर खेचले.