Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

जयगड येथे दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील आगरनरळ फाटा ते भाईवाडी जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले. स्वाराचा या अपघातात मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज विश्वास यादव (वय ३३, रा. चवे-बौध्दवाडी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पंकज यादव हा दुचाकीवर सोबत प्रथमेश प्रकाश पवार(रा. देवूड-बौद्धवाडी, रत्नागिरी) याला घेऊन खंडाळा ते आगरनरळ मार्गे चवे असा जात असताना निष्काळजपणे गाडी चालविल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूस जावून गटारात पडून अपघात झाला. यामध्ये पंकजला गंभीर दुखापत झाली त्याचा मृत्यू झाला तर प्रथमेश पवार याला लहानमोठी दुखापत झाली.पंकज पवार स्वताच्या मृत्यूस व दुचाकीच्या नुकसानीस कारणाभूत झाला.या प्रकरणी पोलिस हवालदार मिलींद कदम यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.