Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पालीत बसमध्ये चढताना महिलेचा हार लांबवला

पालीत बसमध्ये चढताना महिलेचा हार लांबवला

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बसस्थानक येथे बसमध्ये चढताना चोरटय़ाने महिलेच्या अंगावरील सोन्याचा हार लाबवला. ही घटना 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती केरु कवळकर (65, ऱा असोडे, त़ा. लांजा) असे या महिलेचे नाव आह़े याप्रकरणी पार्वती यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गुह्यातील माहितीनुसार, पार्वती या 18 मार्च रोजी लांजा असोडे येथून सकाळच्या बसने पाली येथील बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. बाजारामध्ये खरेदी करुन पार्वती पाली बसस्थानक येथे आल्या होत्य़ा याठिकाणी 10.30 वाजता असोडे लांजा येथे जाणाऱ्या बसमध्ये त्या चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा उठवत त्यांच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरटय़ाने लांबवल़ा अशी तक्रार पार्वती यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आह़े.