Tuesday, May 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नाचणे येथे आईचा खून करणाऱ्या मुलाची जामिनावर मुक्तता

नाचणे येथे आईचा खून करणाऱ्या मुलाची जामिनावर मुक्तता

रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे-शांतीनगर येथे आईचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली. अनिकेत शशिकांत तेली ( रा. शांतिनगर, नाचणे-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

मागील दोन महिन्यापासून कारागृहात असलेल्या अनिकेत याने जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यातील महितीनुसार अनिकेत हा त्यांची आई व आजी यांच्यासोबत नाचणे -शांतीनगर येथील घरी वास्तव्य करत होता. तर त्याची चुलती ही शेजारी रहावयास होती. २५ ऑगस्टला रात्री अनेकेत याने स्वयंपाक घरातील धारदार चाकुने झोपेत असलेल्या आई पूजा शशिकांत तेली (वय ५०) हिचा गळा चिरुन खून केला. तसेच अनिकेत याने स्वतःच्या हातावर वार करुन ड्रेनेज क्लिनर प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. अशी नोंद शहरपोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी अनिकेतविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली होती. तो गेले दोन महिन्यापासून कारागृहात होता. संशयित अनिकेतने सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी त्याची २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.