दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील पणदेरी मराठवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा व लोखंडी कपाट फोडून रोख रक्कमेसह सोन्या-मोत्याची नथ असा एकूण ३७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १६ जुलै रोजी सकाळी १०:४५ वाजल्यापासून दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या मुदतीत ही चोरी घडली असून, यासंदर्भातील फिर्याद दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ५:४४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आली.
फिर्यादी सौ. सुजाता भैकरे यांच्या मालकीच्या बंद घराचा मागचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट हत्याराने फोडून आतील तिजोरी उघडली व त्यातून रोख रक्कम आणि मोत्याची नथ फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीने चोरून नेली.









