Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अमंली सदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

अमंली सदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील उर्दू स्कूलच्या पाठीमागील बाजूला, ब्राऊन हेरॉइन सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दूल रऊफ इक्बाल डोंगरकर (वय ३५, रा. कर्ला, रत्नागिरी) असे संशयित हेरॉइन सेवन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास कर्ला येथील उर्दू स्कूलच्या पाठीमागे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा बेकायदेशीरपणे ब्राऊन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार गणेश सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.