Sunday, September 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

मंडणगड:- तिडे-निमदेवाडी गावात हातात चाकू घेऊन फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड येथे घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार विशाल विठ्ठोबा कोळथरकर यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी नितीन नरेश मोहिते (वय 29, रा. तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा गावात हातात चाकू घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून 20 रुपये किमतीचा एक लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 117/2026 नुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.