Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी

स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी

स्विफ्ट चालकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील दस्तुरी चिंचघर रेवेचीवाडी येथे २४ मे रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. समोरून वेगात आलेल्या स्विफ्ट कारने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी खेड पोलिसांत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष भागोजी पवार (वय ५२, रा. भाईंदर पूर्व, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती अकीब अख्तर कमाने हे पल्सर मोटारसायकल ( एमएच ०८ एवाय ०२३४ ) वरून खेडच्या दिशेने येत होते. अकीब कमाने मोटारसायकल चालवत होते. त्यावेळी खेड बाजुकडून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कार ( एमएच ०४ केएफ ७०८९) च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी महिला आणि त्यांचे पती अकीब कमाने यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तसेच, मोटारसायकल आणि स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्विफ्ट कार चालक सुभाष भागोजी पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.