संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- कोणतेही कारण नसताना दगड मारुन दुखापत करणाऱ्या संशयित अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साळवी स्टॉप ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोशन सुरेश मोरे (वय ४१, रा. सयाजीनगर नाचणे, रत्नागिरी) हे साळवी स्टॉर येथील कमानीजवळ कोकणनगर दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर आपला मित्र रफिक यांच्याबरोबर बोलत होते. शेजारी असलेली रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ५१९३) मधील संशयित चालकाने फिर्यादी यांची मान पकडून रस्त्यावर पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी रोशन मोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









