Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी साखरपा सुर्वेवाडीत १ लाखाच्या दागिन्यांची चोरी

साखरपा सुर्वेवाडीत १ लाखाच्या दागिन्यांची चोरी

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडीमधील घरातून १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी माय-लेकींवर देवरुख पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत सरिता सुरेश सुर्वे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात खबर दिली. सरिता सुर्वे यांनी घराच्या माळ्यावर पत्र्याच्या पेटीत सोन्याचे दागिने ठेवले होते. ५६ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र, १३ हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, १० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २७ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ४ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या चोरीला गेल्याचे सरिता सुर्वे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार १० सप्टेंबर २०२४ ते १० जून २०२५ या कालावधीत घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर व उपनिरीक्षक नामदेव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माय-लेकींवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.