राजू शेट्टी; 15 मे नंतर वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारा
रत्नागिरी:- राज्याच्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी आणि आलिशान गाड्यांसाठी सरकारकडे कोट्यवधींचा निधी आहे, मात्र कोकणच्या हापूस उत्पादकांच्या तोंडाला २२० रुपये देऊन पानं पुसली जात आहेत. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी आता गावोगावी रान पेटवा. १५ मे नंतर आम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देऊन तिथेच जेवायला घुसणार,” असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
रत्नागिरीतील आयोजित सभेत ते बोलत होते. बालाजी हॉल मध्ये आयोजित शनिवारी भव्य शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आंबा बागायतदार संघटनो उपाध्यक्ष बावा साळवी, बागायतदारों नेते तथा माजी आमदार बाळ माने, राजेंद्र कदम, काका मोटे, गणेश गावकर (सिंधुदुर्ग), शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, चंद्रकांत शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी नेते आणि मोठय़ा संख्येने आंबा-काजू उत्पादक उपस्थित होते.
राज्यावर आज 9 लाख कोटींचे कर्ज असताना शक्तीपीठासारख्या प्रकल्पांवर 1 लाख कोटी उधळले जात आहेत. पण कोकणातील आंबा-काजूवर पीक कर्ज घेणाऱया शेतकऱयीं अवस्था बिकट आहे. सरकारने तत्काळ सरसकट कर्जमाफी देऊन या शेतकऱयांया पाठीशी उभे राहावे, अशी मागणी त्यांनी केली. इथे जो भांडतो, त्यालाच न्याय मिळतो, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा कोकणातील शेतक्रयांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
कोकणातील नेत्यांया मनमानीवरही प्रहार
कोकणातील एकाही नेत्याला 220 रुपयांच्या मदतीबद्दल राग का आला नाही? असा सवाल करत शेट्टी यांनी स्थानिक नेत्यांवरही टीकास्त्र सोडले. या नेत्यांना कलमाला उलटे टांगले तर त्यांया शर्टाया खिशातून 2 हजार ा. पडतील. मग 220 ा. दयायला लाज आहे की नाही असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. कोकणातील शेतकरी, आंबा-काजू बागायतदार आणि मच्छीमारांनी एकजूट केली तर तुमची राजवट उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. ‘बटेंगे-कटेंगे‘ सारखे भावनिक मुद्दे करून लोकांना फार काळ उल्लू बनवता येणार नाही. जनतेच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर जनता तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, हे इथल्या प्रस्तापितांनी लक्षात ठेवावे.
ॲडव्हान्सवर व्याज आकारले तर व्यापाऱयों लायसन रद्द करा
आता आपल्याला आंबा उत्पादकांना कायतरी निर्णय घ्यावा लागेल. बाजारसमितीतील व्यापाऱयांनी जर आंब्यो दर बदल केले तर त्यांया पेढय़ा उध्वस्त केल्या जातील असे ठणकावले आहे. तसा अॅडव्हॉन्समधील एक ापयाही देणार नसल्यो सांगितलेय. काही व्यापारी बागायतदारांनी घेतलेल्या अॅडव्हान्सवर व्याज लावतात, ते बेकायदेशीर आहे, जर व्याज आकारताना आढळले तर त्यो लायसन रद्द करण्या इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. जर व्याज मागितलं तर ते कसे वसूल करून दाखवा, औषधविक्रेत्यांनीही नाटकं ााालू देणार नाही, असे ठणकावले आहे.
आता धमक्यांना शेतकरी घाबरणार नाही: बावा साळवी
शेतकरी नेते बावा साळवी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, 2017 पासून आम्ही रडतोय, पण सरकारला जाग येत नाहीये. येथील राजकारण्यांना सत्तेचा माज आला असून त्यांना शेतकऱयांया आवाजापेक्षा रस्त्यांच्या कंत्राटात जास्त रस आहे. आता शेतकरी धमक्यांना घाबरणार नाही, मुंबईत जेव्हा आम्ही धडक देऊ तेव्हा येथून हजारोंचा जनसागर उसळेल. असा इशारा आंबा उत्पादक संघटनो नेते उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी दिला.
कोकण गिळंकृत करण्याचा दिल्लीवाल्यां डाव: विनायक राउत
आज 50 टक्के मजूर (गुरखे) कमी आल्याने शेतक्रयाला स्वत राबावे लागत आहे. आंबा-काजू बोर्डाची मागणी आम्ही लावून धरली, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक आणि बॉक्साईट माफियांच्या माध्यमातून कोकणची जमीन दिल्लीवाल्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. मच्छीमारांना डिझेल महाग आणि शेतक्रयाला तुटपुंजी मदत; ही सत्ताधाऱयांसाठी शरमेची बाब आहे. भविष्यातील पिढीला वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.









