Wednesday, August 19, 2026
spot_img
Home लांजा विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

लांजा तालुक्यातील उपळे येथील घटना

लांजा:- तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या अशोक जान कदम (वय ६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अशोक कदम यांनी काही दिवसांपूर्वी (नक्की तारीख समजू शकलेली नाही) चुकून किंवा नजरचुकीने विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना प्रथमोपचारासाठी सुरुवातीला सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले होते.

तेथील प्रकृतीनुसार पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील शासकीय सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना ०६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०१ वाजता पोलीस ठाण्यात बीएनएसएस १९४ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.