२०२१ मध्ये गोव्यात घडली होती घटना; १३ साक्षीदार तपासले
खेड:- कामानिमित्त गोवा येथे गेलेल्या युवतीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आनंद प्रकाश वाढवे (वय २३)याला येचील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी गुरुवारी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना सप्टेंबर २०२१ मध्ये घडली होती. या प्रकरणात १३ साक्षीदार तपासण्यात आले.
या घटनेतील पीडितह वाढवे याच्यावर विश्वास ठेऊन गोव्याला गेली होती. दरम्यान ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेने आईच्या कानावर घातली. याबाबत विचारणा केली असता तिला ठार मारण्याची धमकी दिली. येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली. विशेष सरकारी वकील ॲड. मेघना सुहास नलावडे यांनी युक्तीवाद केला.









