Saturday, May 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरीत रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते मजगावरोड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भिकाभाई सलाट (वय ३०, रा. कच्ची निवास, सारसा, आनंद, राज्य गुजरात) असे सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास मारुती मंदिर ते मजगावरोड कडे जाणाऱ्या सार्वजिक रस्त्यावरील हॉटेल गोपाळ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महेश सलाट यांनी आपल्या ताब्यातील मोटार (क्र. जीजे -२३ ए डब्ल्यू २२५९) ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशी पार्क केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी धुमाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.