Monday, May 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत मनसेचा हिंदी शिकवण्यास विरोध

रत्नागिरीत मनसेचा हिंदी शिकवण्यास विरोध

रत्नागिरी:- राजसाहेबांचा आदेश आणि पत्र घेऊन लगेचच रत्नागिरी शहरातील महत्वाच्या शाळाना भेट देऊन तेथील मुख्याध्यापकांची आज मनसे रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली. आणि हिंदी शिकवण्यास विरोध करावा असे निवेदन दिले.

इयत्ता पहिली पासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच या सन्माननीय मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यस्थापनांना निवेदन देण्यात आले असून या हिंदी सक्तीला मनसे बरोबरच मराठी माणूस म्हणून शिक्षक तसेच पालक वर्गाने देखील याला विरोध करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर , विभाग अध्यक्ष सोम पिलनकर, रोहन शेलार , अँड. माधवी पालकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाचे पत्र रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूल, सॅक्रेड कॉन्व्हेन्ट हायस्कूल , विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल , पोतदार इंग्लिश मिडीयम स्कूल आदी शहरातील प्रमुख शाळांना निवेदन देण्यात आले.